Ad will apear here
Next
येस बँकेची महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीशी भागीदारी
मुंबई : खासगी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची बँक असलेल्या येस बँकेने स्टार्ट-अप कंपन्यांना आर्थिक पाठबळ  देण्याकरीता महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी (एमएसआयएनएस) या संस्थेशी करार केला आहे. एमएसआयएनएस ही संस्था महाराष्ट्र राज्यातर्फे स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी उभारण्यात आली आहे. गेल्या २५ ते २९ जून या कालावधीत महाराष्ट्र स्टार्ट-अप सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्या काळात नोंदविण्यात आलेल्या स्टार्ट-अप कंपन्यांना बँकिंग सेवा पुरवण्याचा येस बँकेचा हा करार आहे.   

‘एमएसआयएनएस’शी झालेल्या कराराबद्दल बोलताना येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर म्हणाले, ‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, तसेच स्टार्ट-अप कंपन्या या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. या कंपन्यांची वाढ होण्यासाठी त्यांना सहाय्य करणे हे येस बँकेने कर्तव्य मानले आहे. या कंपन्यांना एकाच ठिकाणी बँकेशी संबंधित सर्व सेवा मिळाव्यात, असे आमचे प्रयत्न आहेत. स्टार्ट-अप सप्ताहाचे आयोजन करून महाराष्ट्र सरकारने व महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोयायटीने मोठी कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्यात सहभागी होण्याची संधी आम्हाला येस-हेड-स्टार्ट-अप या योजनेच्या माध्यमातून मिळाली, याचे आम्हाला समाधान आहे.’ 

महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोयायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इ. रविंद्रन म्हणाले, ‘उद्योजकता वाढीसाठी, त्यासाठीचे वातावरण निर्माण होण्याकरीता दरवर्षीप्रमाणे आम्ही महाराष्ट्र स्टार्ट-अप सप्ताह आयोजित केला. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी विविध कल्पकता व नावीन्य यांना या उपक्रमातून उत्तेजन दिले जाते. स्टार्ट-अप उद्योगांनी नाविन्यपूर्ण उत्पादने काढावीत, अशी सरकारची इच्छा आहे. ती उत्पादने योग्य वाटल्यास खरेदी करण्यातही आमचा पुढाकार असेल. येस बँकेशी भागिदीरी करण्याने स्टार्ट-अप्सना बँकिंगच्या चांगल्या सुविधा मिळतील व त्यांच्या व्यवहारांमध्ये सुकरता येईल, असा विश्वानस वाटतो.’ 

किमान आवश्यक शिल्लक रकमेची अट नसलेले विशेष चालू खाते, एपीआय बँकिंग, यूपीआय, वॉलेट सेवा यांसारख्या डिजिटल व कॅश व्यवस्थापनाच्या सुविधा,परकीय चलनविषयक विविध सुविधा आणि व्यवसायासंबंधी सल्ला देणारी सेवा, नियमित बँकिंग सेवेव्यतिरिक्त व्यवसायातील गुंतवणूक, व्यवसायाचे पालकत्व याविषयी मार्गदर्शन, व्यापारी गाळ्यांमध्ये सवलतींच्या दरांत जागा मिळवून देणे, अर्थ व कर यांविषयी सल्ला, समान स्वरुपाचा व्यवसाय करणार्याे इतर व्यावसायिकांशी भागिदारी करण्याविषयी मदत करणे, व्यवसाय व व्यक्तिगत स्वरुपाची कर्जे मिळण्याची सुविधा ही बँकेच्या योजनेची खास वैशिष्ट्ये आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZYMBQ
Similar Posts
येस बँकेतर्फे निधीची उभारणी मुंबई : येस बँक या भारतातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील यशस्वीपणे इश्यूइन्स पूर्ण करणाऱ्या बँकेने आंतरराष्ट्रीय डेब्ट बाजारात तब्बल ६०० दशलक्ष यूएस डॉलर्सचे बाँड इश्यूइन केले आहेत.
‘येस बँक’ शाश्वतता अहवाल प्रसिद्ध करणारी पहिली भारतीय बँक मुंबई : भारतामध्ये खासगी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची बँक असलेल्या येस बँकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ‘फ्युचर नाउ’ शाश्वत कामगिरी आढावा (सस्टेनेबिलिटी परफॉर्मन्स रिव्ह्यू) जारी केला आहे. ‘टीसीएफडी’च्या शिफारशींनुरूप वर्धित शाश्वत अहवाल प्रसिद्ध करणारी येस बँक ही पहिली भारतीय बँक ठरली आहे.
व्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंज मुंबई : भारताच्या खासगी क्षेत्रातील पाचव्या क्रमांकावरील सर्वात मोठी बँक येस बँक व व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूआइएफ) यांनी संयुक्तपणे व्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंज ही स्पर्धा आयोजित केली होती. आपल्या अर्थव्यवस्थेचे सबलीकरण व्हावे आणि बदलासाठी अधिक चांगले स्रोत उपलब्ध असावेत, तसेच भारतीय
गडकरी यांची सलमान खान, राणा कपूरशी भेट मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला यशस्वीरित्या चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे देशभर चालू असलेल्या ‘संपर्क से समर्थन’ अभियानाअंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत चित्रपट पटकथा लेखक सलीम खान, अभिनेते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language